GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण रेल्वे स्टेशन परिसरात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

Gramin Varta
87 Views

चिपळूण: येथील रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या स्मशानभूमी शेजारील पाण्याच्या टाकीजवळ एका अंदाजे ४५ ते ५० वर्षे वयोगटातील पुरुष जातीचा मृतदेह सोमवारी सकाळी आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अद्याप या मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. चिपळूण पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २३ मार्च रोजी सकाळी ८.१० वाजण्याच्या सुमारास चिपळूण रेल्वे स्टेशन परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ एक व्यक्ती मृतावस्थेत पडून असल्याची माहिती समोर आली. स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती तातडीने पोलिसांना दिली. घटनेची वर्दी मिळताच चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. मयत व्यक्तीचे वय अंदाजे ४५ ते ५० वर्षे असून त्याचे नाव किंवा पत्ता अद्याप समजू शकलेला नाही.

या घटनेची नोंद २३ मार्च रोजी दुपारी १४.३५ वाजता चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. सदर व्यक्ती कोण आहे आणि तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा शोध पोलीस घेत आहेत. या वर्णनाच्या कोणत्याही व्यक्तीबाबत कोणाला माहिती असल्यास त्यांनी चिपळूण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3388233
Share This Article