GRAMIN SEARCH BANNER

आयपीएलकरता मुंबईत आलेल्या ब्रिटिश इंजिनिअरचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

Gramin Varta
158 Views

मुंबई: आयपीएल २०२६ च्या दरम्यान, क्रिकेट जगताला हादरवून टाकणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आयपीएल सामन्यांसाठी बीसीसीआयमध्ये ब्रॉडकास्ट इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या एका ब्रिटिश नागरिकाचे निधन झाले आहे.

बीसीसीआय ब्रॉडकास्ट इंजिनिअर इयान विल्यम्स लँगफोर्ड असे या मृत व्यक्तीचे नाव असून, ते मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमधील त्यांच्या खोलीत मृतावस्थेत आढळले. मिळालेल्या माहितीनुसार, २९ मार्च रोजी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) यांच्यातील सामन्यानंतर इयान आपल्या खोलीत (खोली क्रमांक २७१५) परतले होते आणि ३० मार्च रोजी ते मृतावस्थेत आढळले.इयान विल्यम्स लँगफोर्ड २४ मार्चपासून मुंबईतील हॉटेलमध्ये राहत होते. २९ मार्च रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यानंतर ते आपल्या खोलीत परतले होते. ते मुंबईतील हॉटेलच्या खोली क्रमांक २७१५ मध्ये राहत होते.

हॉटेलच्या रिसेप्शनिस्टने ३० मार्च रोजी, इयानच्या खोलीत फोन केला, असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांची विचारपूस करण्यासाठी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आले. कर्मचाऱ्यांनी इयानच्या खोलीच्या दारावर थाप मारली, पण आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी मास्टर की वापरून दार उघडले. इयान लँगफोर्डचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता. हॉटेलमधील डॉक्टरांनी इयानची तपासणी करून त्याला मृत घोषित केले. त्यानंतर मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात त्याच्या मृत्यूची तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्याचा मृत्यू कसा झाला आणि खोलीत त्याच्यासोबत काय घडले, हे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Total Visitor Counter

3391780
Share This Article