GRAMIN SEARCH BANNER

देवधमापूर येथे ‘जलसा गीत गायन’ स्पर्धेचा मोठा जल्लोष; कोसुंबच्या त्रिसरण संगीत जलसा मंडळाने पटकावला प्रथम क्रमांक

संगमेश्वर (दिनेश आंब्रे): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून संगमेश्वर तालुक्यातील देवधमापूर येथे आयोजित करण्यात आलेली ‘पंचकोशी व निमंत्रित जलसा गीत गायन स्पर्धा २०२६’ अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा देवधमापूर आणि स्थानिक व मुंबई जयंती उत्सव मंडळ देवधमापूर यांच्या संयुक्त विद्यमाने १३ एप्रिल रोजी या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण आठ नामांकित संघांनी सहभाग नोंदवून आपल्या कलागुणांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या स्पर्धेचे अचूक परीक्षण करण्यासाठी नामांकित परीक्षक म्हणून श्री. संजय गमरे आणि श्री. रत्नदीप कदम गुरुजी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

अटीतटीच्या झालेल्या या स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर ‘त्रिसरण संगीत जलसा मंडळ, मौजे कोसुंब’ या संघाने प्रथम क्रमांक पटकावून ५,५५५ रुपये आणि आकर्षक चषक आपल्या नावावर केला. मान्यवर अध्यक्ष व सचिवांच्या हस्ते या विजेत्या संघाला गौरविण्यात आले. स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचा ४,४४४ रुपये व चषकाचा मान ‘मौजे गाव बेलारी’ या संघाला मिळाला, तर तृतीय क्रमांकाचे ३,३३३ रुपये आणि चषकाचे पारितोषिक ‘मौजे गाव धामणी’ या संघाने प्राप्त केले. संपूर्ण स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली असून, बाबासाहेबांच्या विचारांना जलसा गीतांच्या माध्यमातून उजाळा देणाऱ्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे. या कार्यक्रमाला स्थानिक ग्रामस्थांसह मुंबईतील चाकरमानी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Visitor Counter

3485943
Share This Article