शिवसेना पक्ष-चिन्हावर २९ एप्रिलला सुनावणीची शक्यता

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

नवी दिल्ली: शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. संगणकीय प्रणालीमार्फत सदर सुनावणीसाठी 29 एप्रिल होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे आता न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना पक्षात जून 2022 मध्ये उभी फूट पडली होती. त्यावेळेस एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदार व 13 खासदार बाहेर पडले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार कोसळले होते. तेव्हापासून हा तिढा कायम आहे. आता शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरण अंतिम युक्तीवादाच्या टप्प्यावर आले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी लवकरच सुनावणी होणार आहे.

यापूर्वी जानेवारी 2026 मध्ये होणारी सुनावणी काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती. आता न्यायालयाने एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी पुरेसा वेळ दिला असून, पुढील आठवड्यात होणारी सुनावणी अत्यंत निर्णायक मानली जात आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *