GRAMIN SEARCH BANNER

नसरापूर प्रकरणी आरोपीस फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न – मंत्री आदिती तटकरे

Gramin Varta
74 Views

मुंबई : नसरापूर येथे घडलेल्या अमानुष आणि संतापजनक घटनेची माहिती मिळाल्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असून, त्या सातत्याने कुटुंबाच्या संपर्कात आहेत.

मनोधैर्य योजनेअंतर्गत पीडित कुटुंबाला आर्थिक सहाय्य दिले जाणार असून, आरोपीस फाशीची शिक्षा मिळावी, यासाठी विशेष सरकारी वकिलामार्फत संपूर्ण प्रयत्न करण्यात येणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

स्थानिक आमदार शंकर मांडेकर यांच्या माध्यमातून मंत्री तटकरे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. या कठीण प्रसंगी राज्य शासन पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभे असून, प्रकरणाचा जलद निपटारा व्हावा यासाठी सुनावणी जलदगती न्यायालयात होणार असल्याचे त्यांनी ग्रामस्थांना आश्वासित केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि मंत्री आदिती तटकरे यांनी पीडित कुटुंबीय व ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्याबाबत आश्वासन दिले आहे. यासंदर्भातील अधिकृत पत्र जिल्हा प्रशासनामार्फत कुटुंबीयांना देण्यात आले आहे.

दरम्यान, महिला व बालविकास विभागाच्या वतीने मनोधैर्य योजनेअंतर्गत पीडित कुटुंबाला आर्थिक व मानसिक सहाय्य दिले जाणार असून, त्यासाठीची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

Total Visitor Counter

3354933
Share This Article