GRAMIN SEARCH BANNER

सिंहगडावरून १५० फूट खोल दरीत पडला पर्यटक

Gramin Varta
80 Views

पुणे : सिंहगडावर सूर्यास्त पाहण्यासाठी गेलेल्या एका पर्यटकाचा पाय घसरून तो सुमारे दीडशे फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. हवेली पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाच्या तत्परतेमुळे पर्यटकाचा जीव वाचविण्यात यश आले.

योगेश मोहन शितोळे (वय ३५, रा. शिरूर) असे जखमी पर्यटकाचे नाव आहे. ते मंगळवारी सकाळी सिंहगड फिरण्यासाठी आले होते. दुपारी साडेचार ते पाचच्या सुमारास ते पश्चिमेकडील ‘हवा पॉईंट’ परिसरात सूर्यास्ताचे छायाचित्र घेण्यासाठी गेले होते. यावेळी गवतावरून पाय घसरल्याने ते सुमारे १५० ते १७० फूट खोल दरीत कोसळले.

दरीत पडल्यामुळे काही वेळातच त्यांची शुद्ध हरपली. सायंकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी तत्काळ ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून आपण दरीत पडल्याची माहिती दिली.या घटनेची माहिती मिळताच हवेली पोलिस ठाण्यातील कर्मचारी अनिकेत काळे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून हवेली आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाशी संपर्क साधला. त्यानंतर बचाव पथक आणि हवेली पोलिसांचे कर्मचारी तातडीने सिंहगडावर दाखल झाले.

Total Visitor Counter

3364989
Share This Article