GRAMIN SEARCH BANNER

गुहागर पोलीस ठाण्यात शॉर्टसर्किटमुळे आग; पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

Gramin Varta
15 Views

गुहागर :  गुहागर पोलीस ठाणे येथे बुधवारी सकाळी अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे वायरिंगला आग लागून काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र पोलीस कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे ही आग वेळीच आटोक्यात आणण्यात यश आले असून संभाव्य मोठा अनर्थ टळल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्यातील वायरलेस रूममध्ये असलेल्या मीटरमधून पुढे जाणाऱ्या वीज वाहिनीमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाले. त्यानंतर वायरिंगने पेट घेतल्याने परिसरात धुराचे लोट पसरले. आग पुढे पसरत असल्याचे लक्षात येताच तेथील पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने अग्निशामक यंत्रांच्या सहाय्याने जळणाऱ्या वायरवर फवारा मारत आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले.

पोलीस ठाण्यात उपलब्ध असलेल्या अग्निशामक बाटलीसह महसूल विभागाच्या परिसरात ठेवण्यात आलेल्या आणखी दोन अग्निशामक यंत्रांचा वापर करून आग काही मिनिटांत आटोक्यात आणण्यात आली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. विशेष म्हणजे पोलीस ठाण्यालगत ट्रेझरी कार्यालय तसेच महसूल विभागाची इमारत असल्याने आग भडकली असती तर गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती.

या घटनेनंतर काही काळ गुहागर पोलीस ठाणे येथील वीज पुरवठा खंडित झाला होता. घटनेची माहिती मिळताच संबंधित विभागाकडून विद्युत यंत्रणेची तपासणी करण्यात आली.

Total Visitor Counter

3364778
Share This Article