चिपळूण (प्रतिनिधी) : दैनिकातील पत्रकारांनी संघटीत होऊन चार वर्षापुर्वी स्थापन केलेल्या पत्रकार संघ, चिपळूण या संघटनेच्या अध्यक्षपदी महेंद्र कासेकर यांची तर सचिवपदी नागेश पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. कापसाळ येथील विश्रामगृहात झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
चिपळूण पत्रकार संघ ही पत्रकारांची नोंदणीकृत संघटना असून या संघटनेच्या माध्यमातून गेली चार वर्षे सातत्याने शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. दरवर्षी अध्यक्षपदासाठी संघटनेतील सदस्यांना संधी दिली जाते. गेल्या चार वर्षात संतोष सावर्डेकर, नागेश पाटील व मुझफ्फर खान यांनी अध्यक्षपदी काम केले. बुधवारी सकाळी ११ वाजता कापसाळ येथील विश्रामगृहात झालेल्या बैठकीत पुढील वर्षासाठी नविन कार्यकारीणी निवडण्यात आली.
त्यानुसार अध्यक्ष – महेंद्र कासेकर, सचिव – नागेश पाटील, उपाध्यक्ष – संतोष उर्फ भाई कुळे, खजिनदार – समीर जाधव, सहसचिव – राजेश कांबळे, कार्याध्यक्ष – सुभाष कदम, सल्लागार म्हणून राजेंद्र शिंदे, संतोष सावर्डेकर, संदीप बाद्रे, तर सदस्य मुझफ्फर खान, राजेश जाधव, सुशांत कांबळे, गौरव तांबे, सुनिल दाभोळे यांची निवड करण्यात आली.
नवनिर्वाचीत अध्यक्ष महेंद्र कासेकर यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यापुढील कालावधीत संघटनेच्या वतीने पत्रकारांच्या हक्कासाठी तसेच सामाजिक उपक्रमांवर विशेष भर देण्याचा मनोदय अध्यक्ष महेंद्र कासेकर यांनी व्यक्त केला. या निवडीबद्दल नवनिर्वाचीत अध्यक्ष महेंद्र कासेकर यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.






