रत्नागिरी: रत्नागिरीतील मराठा मंदिर अ. के.देसाई हायस्कूल माजी विद्यार्थी संघाने जिल्हास्तरीय भव्य नाइट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट लीग स्पर्धा २२ ते २४ मे या कालावधीत होणार आहे.
सायंकाळी ५ ते रात्री ११ या वेळेत प्रशालेच्या पटांगणात ही स्पर्धा होणार आहे. विजेत्या संघास २५ हजार, उपविजेत्या संघास १५ हजार रुपयांचे रोख बक्षीस व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. याशिवाय अन्य पारितोषिकेही देण्यात येणार आहेत.
सर्व इच्छुक संघांनी आपली नावनोंदणी १८ मे रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत करावी. प्रथम येणाऱ्या पहिल्या १६ संघांना या स्पर्धेत सहभागी होता येईल स्पर्धेसाठी ३ हजार रुपये प्रवेश शुल्क आहे
नावनोंदणीसाठी आकाश परीट (9130264354), योगेश कोरगावकर (9822159755), अच्युत गजभिये (7020496238), सुदेश निवळकर (9730508675), मंदार आचरेकर (9130275511) यांच्याशी संपर्क साधून संघाची नावनोंदणी संपूर्ण प्रवेश शुल्क भरून त्वरित करावी, असे आवाहन शाळेच्या माजी विद्यार्थी संघामार्फत करण्यात आले आहे.







