GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : टिके येथे विजेच्या धक्क्याने महावितरण कर्मचारी जखमी

Gramin Search
9 Views

रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील टिके येथे वीज दुरुस्तीचे काम करत असताना विजेचा जोरदार धक्का लागून महावितरणचा एक कर्मचारी गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवार, १६ जून रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. तेजस राजेंद्र सावंत (२५, रा. नाणिज, रत्नागिरी) असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव असून, त्याला तातडीने उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तेजस सावंत हा महावितरणमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. सोमवार, १६ जून रोजी तो टिके येथे वीज दुरुस्तीच्या कामावर होता. सकाळी साडेअकराच्या सुमारास काम करत असताना त्याला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच, त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला तात्काळ मदत करून रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेजसवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

2647118
Share This Article