GRAMIN SEARCH BANNER

आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ 800 फूट दरीत कोसळून 8 तरुणांनी गमावला जीव

Gramin Varta
432 Views

सातारा : महाबळेश्वर पोलादपूर रस्त्यावर आंबेनळी घाटात रविवारी रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात स्कॉर्पिओ गाडी तब्बल 800 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना समोर आली.

या दुर्घटनेत अंदाजे 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघातग्रस्त सर्वजण साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील रहिवासी असल्याचे समजते आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच रविवारी रात्री 10 वाजल्यापासून महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू असून पोलीस आणि प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र, दुर्घटनेचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

प्राथमिक माहितीनुसार मृतांमध्ये महेश अनिल पवार (वय 25), आदित्य अशोक साळुंखे (वय 21), रितेश राजेंद्र लोखंडे (वय 25), सुहास जितेंद्र लोखंडे (वय 20), अंश समीर चव्हाण (वय 18), उत्कर्ष आनंद शिंगटे (वय 21), अनिल अभिमन्यू शिंगटे (वय 25) आणि नितीन किसन नायकोंडे (वय 35) यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, रात्री 10 वाजल्यापासून महाबळेश्वर ट्रेकर्स तसेच प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमकडून युद्धपातळीवर मदत व बचावकार्य सुरू असून पोलीस आणि प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले आहे. दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आंबेनळी घाटावर अनेक घातक वळणं…

कोकण आणि दख्खनच्या पठाराला जोडणारा सर्वात लांब घाट अशी आंबेनळी घाटाची ओळख. रायगडमधील पोलादपूर आणि साताऱ्यातील महाबळेश्वर या दोन मुख्य शहरांना हा घाट जोडतो. 40 किमी लांबीचा हा घाट साधारण 625 मीटर म्हणजेच 2051 फुटांच्या उंचीवर असून, सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून ही घाटवाट पुढे जाते. या घाटात अनेक तीव्र वळणं असून वाहनांची वेगमर्यादा पाळणं इथं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. त्यामुळं या वळणांचा थरार अनुभवताना समससूचकता आणि भान राखून वाहन चालवणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरतं.

Total Visitor Counter

3487200
Share This Article