GRAMIN SEARCH BANNER

हातखंब्यात मध्यरात्री घरफोडी, 10 तोळे सोन्यासह लाखोंचा ऐवज लंपास

Gramin Varta
834 Views

रत्नागिरी : हातखंबा सुतारवाडी परिसरात पुन्हा एकदा चोरीची घटना घडून परिसरात खळबळ उडाली आहे. शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एका घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि 10 तोळे सोन्याचे दागिने व 5 लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन फरार झाले. काही दिवसापूर्वीच या परिसरात चोरीची घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा चोरीची घटना घडल्याने परिसरात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही घटना मृणाल महेश पांचाळ (वय 48) यांच्या घरी घडली असून, त्यांनी रविवारी सकाळी घरातील कपाट फोडलेले आणि वस्तू विस्कटलेल्या अवस्थेत दिसताच तत्काळ रत्नागिरी ग्रामीण पोलिसांना माहिती दिली.

चोरट्यांनी खिडकीचे गज उचकटून घरात प्रवेश केला आणि लोखंडी कपाट फोडून सोन्याचे दागिने, रोकड अशा मौल्यवान वस्तू चोरून नेल्या. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक, श्वानपथक आणि फॉरेन्सिक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ठिकाणी पंचनामा करून गुन्हा नोंदवला आहे.

या परिसरात गेल्या काही दिवसांत चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत

Total Visitor Counter

3369322
Share This Article