GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत विभागात एसटीला दररोज ८५ हजार लिटर डिझेलची गरज

Gramin Varta
37 Views

रत्नागिरी: एसटीच्या रत्नागिरी विभागातील 9 आगारांमधील 650 हून अधिक बसेससाठी दररोज 85 हजार लिटर तर महिन्याला 25 लाख लिटर डिझेलची आवश्यकता भासते. एप्रिलमध्येही लाखो लिटरच्या डिझेलचा वापर झाला होता.

एसटीच्या रत्नागिरी विभागातील 9 आगारांत एकूण 650 बसेस आहेत. त्यातील दरदिवशी 600 हून अधिक वाहने रस्त्यांवर धावतात. एका एसटी बसचे सरासरी चार ते साडेचार अॅव्हरेज असते. प्रत्येक डेपोनिहाय पळणारी वाहने व त्यांच्या होणाऱ्या किलोमीटरनुसार डिझेल वापरले जाते. प्रत्येक आगाराच्या ठिकाणी 10 ते 20 हजार लिटरची एक टाकी आहे. रत्नागिरी, चिपळूणसह इतर आगारांना दररोज 10 हजार लिटर डिझेल लागते तर काही डेपोंना 7 किंवा 9 हजार लिटर डिझेलची आवश्यकता असते.

दरम्यान, दोनवेळा डिझेलचे दर वाढले आहेत. त्यामुळे येत्या काळात एसटीची पुन्हा भाडेवाढ होण्याचे संकेत परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार आहे. एसटीला इंधन कंपन्यांकडून पुरेसा डिझेलचा पुरवठा मात्र होत असल्याची माहिती देण्यात आली.

Total Visitor Counter

3417380
Share This Article