GRAMIN SEARCH BANNER

खेड येथे ‘लाइफ स्टार मेडिको’चा शानदार उद्घाटन समारंभ संपन्न

Gramin Varta
82 Views

खेड: शहरातील व्यावसायिक वैभवात भर घालणाऱ्या मुकादम लँडमार्क येथे सौ. रोशनी संदीप निकम यांच्या ‘लाइफ स्टार मेडिको’ या नव्या औषध दुकानाचा भव्य उद्घाटन समारंभ सोमवारी अत्यंत उत्साहात पार पडला. या नूतन दालनाचे उद्घाटन भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर आणि विद्यमान नगरसेविका सौ. वैभवी वैभव खेडेकर यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले.

या उद्घाटन सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील अनेक प्रमुख नेत्यांनी उपस्थिती लावून निकम परिवाराला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यामध्ये प्रामुख्याने उपस्थित राहिलेल्या खेडच्या नगराध्यक्षा सौ. माधवीताई राजेश बुटाला, नगरसेविका सौ. रेश्मा खतीब तसेच भाजपा अल्पसंख्याक सेलचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व नगरसेवक गटनेते श्री. रहीमभाई सहिबोल यांनी या नवीन व्यवसायाचे कौतुक केले.

या सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी भाजपा खेड तालुकाध्यक्ष श्री. ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष श्री. भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, भाजपा सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार यांच्यासह ओवैस चौगुले, प्रदीप भोसले व इतर अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुरू झालेल्या या अद्ययावत मेडिकलमुळे नागरिकांना दर्जेदार औषधोपचार सेवा उपलब्ध होणार असून, पहिल्याच दिवशी या प्रतिष्ठानला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. निकम परिवाराने उपस्थित सर्व पाहुण्यांचे स्वागत करून आभार मानले.

Total Visitor Counter

3485127
Share This Article