GRAMIN SEARCH BANNER

फुणगूसचा ‘मनाचा राजा’ साहिम खान: कर्तव्यतत्परता आणि मैत्रीचे अनोखे मिश्रण!

Gramin Search
13 Views

संगमेश्वर : इक्लाक खान यांनी आपल्या मित्राविषयी प्रेम व्यक्त करण्यासाठी वाढदिवसाला शब्दरूपी शुभेच्छा दिल्या आहेत.फुणगूस गावाचा सुपुत्र, सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेला आणि सदैव हसतमुख व उत्साही व्यक्तिमत्त्व, सायलू खान याचा आज वाढदिवस. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना समजून घेणारा, दिलदार मनाचा आणि प्रत्येक प्रसंगात मदतीला धावून जाणारा हा तरुण, मित्रपरिवारात ‘मनाचा राजा माणूस’ म्हणूनच ओळखला जातो.

साहिम उर्फ सायलू खान, एक अत्यंत खेळकर आणि खिलाडूवृत्तीचा तरुण. तो प्रचंड धाडसी आणि तितकाच आक्रमक असला तरी, मैत्री जपण्यात त्याचा हात कोणीही धरू शकत नाही. त्याच्या तरुण वयातच त्याने रिक्षा व्यवसायात आपले नशीब आजमावले आणि त्यात तो यशस्वी देखील झाला आहे.

सायलूची सर्वात महत्त्वाची ओळख म्हणजे त्याची अतुलनीय कर्तव्यतत्परता. कोणतीही व्यक्ती अडचणीत असो वा मदतीची गरज असो, सायलूला हाक मारताच तो क्षणाचाही विलंब न लावता मदतीला धावून येतो. गरूडाप्रमाणे वेगवान आणि निःस्वार्थीपणे मदत करण्याची त्याची वृत्ती अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. मित्रांसाठी तर तो ‘जीव की प्राण’ आहे आणि नेहमीच मित्रांच्या गराड्यात रमलेला दिसतो. मैत्री करायची तर ती दिलखुलासपणे, आणि दुश्मनी करायची तर ती उघडपणे व ताकदीने, हे सायलूचे समीकरण फारच वेगळे आहे.
राजकारणाची आवड असलेला सायलू, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आपले आदर्श मानतो. त्यांच्या विचारांनी तो प्रभावित झाला असून, राजेंद्र महाडिक यांच्या नेतृत्वावर त्याचा गाढ विश्वास आहे. सायलूला पाहिल्यावर हाडाचा शिवसैनिक कसा असतो, हे लगेच लक्षात येते.

अशा या प्रचंड धाडसी, आक्रमक पण तितक्याच मोठ्या मनाच्या आणि उदयोन्मुख तरुणाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! त्याच्या पुढील यशस्वी वाटचालीस अनेक सदिच्छा!

Total Visitor Counter

2650747
Share This Article