GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण बसस्थानकावर प्रवाशाची सोनसाखळी लंपास; १ लाखाचा ऐवज चोरीला

Gramin Search
22 Views

चिपळूण: येथील एस.टी. बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना एका महिलेची सोनसाखळी चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १५ जून रोजी सकाळी ९.२५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी १६ जून रोजी रात्री ९.१७ वाजता चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शीतल शांताराम चाळके ( ६०, रा. लोटेमाळ, चाळकेवाडी, खेड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या आणि त्यांची भाची रुची संतोष शिर्के (वय २०) चिपळूण एस.टी. बसस्थानकावरून दोणवली गांग्रई एस.टी. बसमध्ये आपल्याजवळील सामानासह चढत होत्या. त्याचवेळी, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून नेली. या चोरीला गेलेल्या सोन्याच्या साखळीची किंमत सुमारे १,००,०००/- रुपये इतकी आहे.

या घटनेमुळे चिपळूण बसस्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चिपळूण पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे.

Total Visitor Counter

3199544
Share This Article