GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण: कळवंडे येथे हातभट्टीवर छापा; सुमारे ३ लाखांचा मुद्देमाल जप्त: राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Gramin Varta
71 Views

चिपळूण: पुणे जिल्ह्यातील मिथेनॉल मिश्रित दारू सेवन दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस दल व राज्य उत्पादन शुल्क ॲक्शन मोडवर आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पोलीस दलाकडून गावठी हातभट्टींवर धाडसत्र सुरू आहे.

तर शुक्रवारी कळवंडे येथे गावठी हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकत सुमारे ३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी नंदेश सदाशिव वरपे ( रा. कळवंडे वरपेवाडी ता. चिपळूण ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या माहितीनुसार कळवंडे वरपेवाडी येथील धरणाच्या बाजूला दक्षिण दिशेस जंगल भागात बेकायदेशीररित्या हातभट्टी सुरू असल्याची माहिती मिळाली.

यानुसार राज्याचे उत्पादन उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, अंमलबजावणी व दक्षता विभागाचे सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, कोल्हापूर विभागाचे अधीक्षक श्रीमती कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुनील आरडेकर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक हर्षद शेख, जवान शुभम काडापुरे, मयूर पुरीबुवा, निखिल लोंढे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कळवंडे वरपेवाडी येथील जंगलमय भागात हातभट्टी सुरू असल्याचे निदर्शनास आले. या कारवाईत सुमारे ६ हजार लिटर रसायन व सुमारे १०५ लिटर हातभट्टी गावठी दारू तसेच हातभट्टी दारू बनवण्याचे साहित्य असे २ लाख ९० हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला असून तो मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सलग हातभट्ट्यांवर कारवाई होत असल्याने हातभट्टी धारकांचे धाबे दणाणले आहेत.

Total Visitor Counter

3483538
Share This Article