GRAMIN SEARCH BANNER

देवरुख शहराच्या विकासासाठी  गाव विकास समिती आणि आम आदमी पार्टीची युती,आपचे जिल्हा अध्यक्ष डॉ. रविंद्र जाधव यांचे मत

Gramin Varta
87 Views

देवरुख, (प्रतिनिधी): देवरुख शहरात विकासाचे आदर्श मॉडेल निर्माण करण्यासाठी गाव विकास समिती आणि आम आदमी पार्टी यांनी एकत्र येत युती केली आहे. शहराचा सर्वांगीण विकास हेच या युतीचे मुख्य ध्येय आहे, असे मत आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष डॉ. रविंद्र जाधव यांनी व्यक्त केले आहे.युतीच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे देवरुख शहराच्या भविष्यातील वाटचालीस नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

डॉ. जाधव यांनी पुढे बोलताना सांगितले की, “विकासाच्या दृष्टीने ज्या नव्या योजना राबविणे गरजेचे आहे, त्या सर्व योजना देवरुख शहरात ही युती निश्चितपणे राबवेल, हा विश्वास आम्ही येथील जनतेला देतो.”
या युतीमध्ये, पाणी पुरवठा, मालमत्ता कर, शिक्षण, आणि आरोग्य यांसारख्या शहराच्या मूलभूत आणि कळीच्या विषयांवर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे डॉ. रविंद्र जाधव यांनी स्पष्ट केले.
आम आदमी पार्टी आणि गाव विकास समितीची ही युती देवरुखकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि शहराला एक आदर्श स्वरूप देण्यासाठी कशा प्रकारे कार्य करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Total Visitor Counter

3072836
Share This Article