GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी नगरपालिकेच्या छंद वर्गाचा प्रारंभ

रत्नागिरी: रत्नागिरी नगरपालिका आणि महिला व बालकल्याण समितीमार्फत आयोजित छंदवर्गाला प्रारंभ झाला.येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या नाट्यगृहात या छंद वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

याचे उद्घाटन महिला व बाल कल्याण समिती सभापती प्रीती सुर्वे, उपसभापती पूजा पवार, नगरसेविका श्रद्धा हळदणकर, मेधा कुलकर्णी, आफ्रिन होडेकर, रुक्सार खान, जागृती पिलणकर, निवेदिता कळंबटे, फौजिया मुजावर यांच्या हस्ते झाले. नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे आणि पालिका प्रशासनाने छंद वर्गासाठी प्रोत्साहन दिल्याचे सौ. प्रीती सुर्वे यांनी यावेळी सांगितले.

छंद वर्गात विद्यार्थ्यांसाठी कागदकाम, कुंभारकाम, बागकाम, व्यक्तिमत्त्व विकास आणि चित्रकला असे विविध प्रकार या घेण्यात येणार आहेत. सुमारे ३०० तीनशे विद्यार्थ्यांनी या छंद वर्गात सहभाग घेतला आहे.

छंद वर्ग येत्या २८ एप्रिलपर्यंत दररोज सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत चालणार आहे. रत्नागिरी पालिकेने प्रथमच अशा मोफत छंद वर्गाचे आयोजन केले आहे. तसेच सहभागी मुलांना अल्पोपाहारही दिला जाणार आहे.

छंद वर्गाच्या उद्घाटनाला दामले विद्यालयाचे मुख्याध्यापक भगवान मोटे, किल्ला शाळेचे मुख्याध्यापक संदीप कांबळे, कागदकाम मार्गदर्शक दीप्तेश पाटील, अनन्या कीर, ओंकार लोध आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

Total Visitor Counter

3486653
Share This Article