GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : राज्यस्तरीय ब्रिज स्पर्धेत फ्रेनिमिस टीमची बाजी

Gramin Varta
3 Views

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा ब्रिज असोसिएशनतर्फे प्राचार्य डॉ. सुभाष देव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय ब्रिज स्पर्धेच्या डुप्लिकेट गटामध्ये अनिरुद्ध संझगिरी व सहकाऱ्यांच्या फ्रेनिमिस टीमने विजेतेपद पटकावले.

पेअर गटात रत्नागिरी ब्रिज असोसिएशनचे सचिव सचिन मुळ्ये आणि आर. व्ही. सोहोनी यांच्या जोडीने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

नक्षत्र हॉल येथे दोन दिवस स्पर्धा सुरू होती. स्पर्धेचे उद्घाटन श्रीमती सुखदा देव यांच्या हस्ते झाले. दुसऱ्या दिवशी बक्षीस वितरणाला रत्नागिरी ब्रिज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन दामले व खजिनदार विनायक मुळ्ये, चिंतामणी दामले आदींच्या हस्ते झाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन केले होते.

स्पर्धेत फ्रेनिमिस संघाचे कर्णधार अनिरुद्ध संझगिरी व सहकाऱ्यांनी ६५.६० गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. अन्य विजेते असे – द्वितीय – सह्याद्री संघ (संपथ श्रीनिवासन व सहकारी), तृतीय – अमनिरा (अमोल देशमुख व सहकारी), चौथा – फोर्थ तूर (उमाकांत सनगर व सहकारी), पाचवा – हजरनिस (डॉ. मिलिंद हजरनीस व सहकारी), सहावा – रत्नागिरी मॅंगो (मोहन दामले व सहकारी).

पेअरच्या स्पर्धेत रत्नागिरीच्या दोन संघांनी बाजी मारली. प्रथम क्रमांक सचिन मुळ्ये व आर. व्ही सोहनी (रत्नागिरी), द्वितीय जितेंद्र क्षीरसागर व नितीन धर्माधिकारी, तृतीय चिंतामणी दामले व सचिन जोशी (रत्नागिरी) आणि चौथा क्रमांक संजय वैद्य व अजित पाटणकर यांनी मिळवला.

स्पर्धेत राजापूरच्या श्रीरांत ताम्हनकर व जितेंद्र करंगुटकर यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र ब्रिज असोसिएशनचे सचिव अनिरुद्ध संझगिरी, स्पर्धा संचालक राजीव देव, स्कोअरर श्री. विश्वनाथ, रत्नागिरी ब्रिज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन दामले, सचिव सचिन जोशी, खजिनदार विनायक मुळ्ये, चिंतामणी दामले आदींसह सभासदांनी मेहनत घेतली. या स्पर्धेसाठी स्वयंसेवक व सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानण्यात आले.

Total Visitor Counter

3483539
Share This Article