GRAMIN SEARCH BANNER

भगवान कोकरे महाराजावर आणखी एक पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल; अडचणीत वाढ

Gramin Varta
381 Views

खेड : लोटे येथील वारकरी शिक्षण देणाऱ्या शाळेत अल्पवयीन मुलीवर संस्थेचे संस्थापक भगवान कोकरे यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

खेड पोलिस स्टेशनमध्ये भगवान कोकरे यांच्यासह कार्यकारी अधिकारी प्रतेश कदम याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. दरम्यान, भगवान कोकरे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण भगवान कोकरे यांच्यासह त्याचे सहकारी प्रितेश कदम याच्यावर पोस्को अंतर्गत आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.

आध्यात्मिक केंद्रात लैंगिक शोषण केल्याचा आणखी एका अल्पवयीन मुलीचा आरोप

आध्यात्मिक केंद्रात लैंगिक शोषण केल्याचा आणखी एका अल्पवयीन मुलीचा आरोप आहे. खेड पोलिस स्थानकात भगवान कोकरे यांच्या विरोधात पोस्को अंतर्गत 4,8 तसेच BNS 64(2 ) (I) 65(1) 74 ,351(3) 3(5) गुन्हा दाखल झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच भगवान कोकरे याच्यासह त्यांचा सहकारी प्रितेश कदम यांना पोलिसांनी अटक केली आहे. अल्पवयीन मुलीच्या आणखी एका तक्रारीमुळे आध्यात्मिक गुरुकुल चालवणाऱ्या भगवान कोकरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या धक्कादायक प्रकरणामुळं रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. भगवान कोकरे यांच्यावर आणखी एक आरोप झाल्यामुळं त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

गोशाळा संस्थापक भगवान कोकरे यांच्या अटकेमुळे रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा म्हणजे पोस्को अंतर्गत कलम 12 व 17 प्रमाणे तसेच BNS 74,351(3) 85 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे भगवान कोकरे यांना अटक झाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आक्रमक झाले आहेत. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करुन भगवान कोकरे यांना अटक करण्यात आली आहे.

Total Visitor Counter

2657028
Share This Article