GRAMIN SEARCH BANNER

‘मन की बात’ कार्यक्रमात पत्रकार आनंद तापेकर यांचा सन्मान

रत्नागिरी: भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या हस्ते आज सकाळी रत्नागिरी येथील प्रसिद्ध पत्रकार व कुस्तीपटू अनंत तापेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या लोकप्रिय 123 वा कार्यक्रमाच्या निमित्ताने रत्नागिरी स्टेट बँक कॉलनी येथील भाजपचे माजी नगरसेवक श्री उमेश कुळकर्णी यांच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक दत्तात्रय मराठे ,तुषार देसाई ,संकेत चाळके ,नितीन गांगण आदी मान्यवर उपस्थित होते

यावेळी रत्नागिरी मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष आणि रत्नागिरीच्या क्रीडा वर्तुळात ‘कुस्तीपटू’ म्हणून ओळखले जाणारे अनंत तापेकर यांचे समाज आणि पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल कौतुक करण्यात आले. जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी तापेकर यांना मोगरा झाडाचे रोप देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला.

या कार्यक्रमाला भाजपचे अनेक स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ‘मन की बात’ कार्यक्रमाचे श्रवण झाल्यानंतर, उपस्थितांनी विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर चर्चा केली. आनंत तापेकर यांचा सत्कार करून भाजपने पत्रकारिता आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचा आदर करण्याची आपली भूमिका अधोरेखित केली.

Total Visitor Counter

2475233
Share This Article