सावर्डे (वार्ताहर) : चिपळूण तालुक्यातील निकम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस तर्फे डॉक्टर दिनाचे औचित्य साधून निकम हॉस्पिटल, सावर्डे येथे उत्साही वातावरणात कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमात इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. वैद्यकीय व्यवसाय म्हणजे केवळ नोकरी नसून ती एक सेवा वृत्तीची जबाबदारी आहे, असे मत डॉ. अमोल निकम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले. “रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे आणि ती अहोरात्र करण्याची तयारी हवी,” असे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. पूजा यादव व आदिती निकम यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत प्रेरणादायी विचार मांडले. विद्यार्थ्यांनी आणि स्टाफ सदस्यांनी निकम हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टरांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.
या कार्यक्रमासाठी डॉ. नागमणी, पत्रकार विनायक सावंत, रविका घाणेकर, सिद्धी सावंत, सेजल घाग, वरदा सावंत, ज्योती सुर्वे, अमर सावंत यांच्यासह लॅब टेक्निशियन, डिप्लोमा नर्सिंग असिस्टंट, ओ.टी. असिस्टंट, लॅप्रोस्कोपी असिस्टंट कोर्सचे विद्यार्थी आणि संपूर्ण स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता.
सावर्डे येथे डॉक्टर दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांकडून डॉक्टरांना शुभेच्छा

Leave a Comment