देवरुख : गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने न्यू इंग्लिश स्कूल वाशीतर्फे देवरुख शाळेत चक्रभेदी सोशल फौंडेशनच्या वैदेही सावंत यांनी दोन सत्र घेतले पहिल्या सत्रात सर्व विध्यार्थ्यांशी तर दुसऱ्या सत्रात मुख्याध्यापकांशी संवाद साधला. विद्यार्ध्याना करिअर मार्गदर्शन तसेच उपस्थित मुख्याध्यापक यांना संस्थेची माहिती सांगितली.विधवा व एकल महिलांच्या मुलांची माहिती देण्याविषयी विनंती केली तसेच विकास आराखडे व मुख्याध्यापकांची भूमिका यावर भाष्य केले. ग्राम संसाधन गट, पंचायत समिती आराखडा याविषयीं थोडक्यात माहिती सांगितली.
संस्था २१ जून २०२५ पासून देवरुख व आजूबाजूच्या गावातील शाळा, मुख्याध्यापक यांना भेटून विधवा व एकल महिलांच्या मुलांना छत्री, दप्तर, गणवेष इ शैक्षणिक मदत देण्यासाठी त्यांची माहिती मागवत आहॆ त्यामध्ये देवरुख हायस्कुल, कन्या शाळा, आठल्ये सप्रे महाविद्यालय, वाशीतर्फे देवरुख इ. शाळा आहेत. देवरुख हायस्कूलचे मुख्याध्यापक मा. कोंकणे सर यांनी मोलाचे सहकार्य केले..
वाशीतर्फे देवरुख येथील शाळेत झालेल्या कार्यक्रमासाठी श्रीम. अनघा दीपक डोंगरे तसेच श्री. प्रथमेश हनुमंत मोरे, श्री. संजय सिताराम आगरे या शिक्षकांनी मेहनत घेतली.सूत्रसंचालन श्री. प्रमोद पवार सरांनी केले. सदर कार्यक्रमाला वांझोळे, देवळे, निवे, तुळसणी इ. शाळेचे सुमारे ५० मुख्याध्यापक उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत विधवा व एकल महिलांच्या मुलींना.कार्यक्रमाच्या शेवटी विधवा व एकल महिलांच्या मुलांना वह्या, छत्री, दप्तर, गणवेष इ. शिक्षण विस्तार अधिकारी मा. श्री.आण्णासाहेब बळवंतराव यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच त्यांनी चक्रभेदी संस्थेचे कार्य मोठे असून आमच्याकडून सर्व प्रकारचे सहकार्य संस्थेला असेल असे आश्वासन दिले. सायली कांबळे,आदर्श रावनंग यांनी मनोगत व्यक्त केले.
उपस्थित सर्वांचे वैदेही सावंत यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली