GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण: स्वच्छ भारत मिशन ग्रामीण स्वच्छ सर्वेक्षण २०२५ उपक्रमास पालवन येथील मारुती सावर्डेकर यांची निवड

चिपळूण : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण उपक्रमास सुरुवात झाली असून चिपळूण तालुक्यातील पालवण सावर्डेकरवाडी येथील मारुती महादेव सावर्डेकर यांची स्वच्छता पुरस्कारासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. आता या सर्वेक्षणासाठी मूल्यांकन पद्धती निश्चित करण्यात आली आहे. ज्यामध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन गुण, ग्रामस्थांचा प्रतिसाद व मानसिकतेतील बदल गुण, सुविधांचा वापर गुण व प्रत्यक्ष निरीक्षण व प्रश्नावली गुण असे मूल्यांकन गुण राहणार आहेत.

केंद्रीय पथकाच्या माध्यमातून तपासणी केली जाणार असून निकष अधिक कठोर करण्यात आले आहेत. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ चा राज्यस्तरीय प्रारंभ झाले असून आता जिल्हास्तरावर या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामध्ये पालवण सावर्डेकरवाडी येथील मारुती महादेव सावर्डेकर यांची निवड झाल्याबाबत ग्रामपंचायत पालवण सरपंच अश्विनी पांचाळ, सामान्य प्रशासन विस्ताराधिकारी स्वप्निल कांबळे, स्वच्छता भारत मिशन समूह समन्वयक आदिती शिंदे, ग्रामपंचायत पालवण ग्रामसेवक प्रमोद दाते, ग्रामपंचायत पालवण कर्मचारी विश्वंभर सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते भरत सावर्डेकर व प्रतिनिधी हर्षल सोनार यांनी शुभेच्छा दिली गावातील स्वच्छतेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली त्यामध्ये वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांचा वापर, दृश्यमान स्वच्छता, ओला सुका कचऱ्याचे वर्गीकरण, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, खतखड्डे, प्लास्टिक संकलन व त्याचे व्यवस्थापनाची पाहणी करण्यात आली. यादरम्यान घरोघरी भेट देऊन नागरिकांच्या स्वच्छतेविषयक सवयी, तसेच परिसरातील एकूण स्वच्छतेचा आढावा घेण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छता सर्वेक्षण २०२५ निवडीबद्दल मारुती सावर्डेकर यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

Total Visitor Counter

2455607
Share This Article