GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण: एक राखी देशासाठी एक राखी सैनिकांसाठी कार्यक्रम उत्साहात

चिपळूण: सामाजिक विकास ग्रुप सेवक यांच्या विद्यमाने एक राखी देशासाठी एक राखी सैनिकांसाठी हा कार्यक्रम सोमवार दि.१४ जुलै रोजी बचत गट कार्यालय तिवडी चिपळूण येथे सकाळी १० वा. तसेच ग्रामपंचायत आकले चिपळूण येथे सकाळी ११.३० वाजता व छत्रपती शिवाजी महाराज सभागृह ग्रामपंचायत खडपोली येथे दुपारी १२.३० वाजता आणि युनायटेड न्यू इंग्लिश स्कूल चिपळूण येथे दुपारी २ वाजता तथा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मिरजोळी येथे दुपारी तीन वाजता मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.

गतवर्षाप्रमाणे यावर्षीही देशसेवेविषयीची भावना वाढीस लागावे म्हणून भारतीय जवानांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने राख्या पाठविणे, भारतीय जवानांना रक्षाबंधनाला आपल्या मायभूमीत आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेता येत नाही, या विचाराने प्रेरित होऊन समाजसेवक विनेश मोहिते सामाजिक विकास ग्रुप यांच्या प्रेरणेने भारतीय जवानांना राखी पाठवण्याचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता. तरी राखी आपल्या सीमेवरील जवानांना आपल्या विभागातून पाठवण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येक गाव, वाडी, प्राथमिक शाळा, अंगणवाडी केंद्र, महाविद्यालय, बचत गट, प्रत्येक ग्रामपंचायतमधून प्रत्येक बहिणीनी एक राखी घेऊन उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे सर्व माजी सैनिक, शिक्षक, विद्यार्थी, महिलावर्ग, तरुण, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरजोळी येथील नवजीवन महिला ग्रामसंघाने सहभाग घेऊन राखी सैनिकांना दिली. या कार्यक्रमाबद्दल सामाजिक विकास ग्रुप सेवक माजी सैनिक संभाजी चव्हाण व समाजसेवक विनेश मोहिते यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

Total Visitor Counter

2455614
Share This Article