रत्नागिरी पोलीस दलाचा नावीन्यपूर्ण उपक्रम; कोकण परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या हस्ते ‘मिशन रॅपिड’चे उद्घाटन

Gramin Varta
68 Views

रत्नागिरी: रत्नागिरी पोलीस दलाने नागरिकाभिमुख, तंत्रज्ञानाधारित आणि पारदर्शक पोलीस सेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ‘मिशन RAPID’ या नावीन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात केली आहे. दिनांक २६ जुलै २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्र किशोर मीना यांच्या शुभहस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या संकल्पनेतून व दूरदृष्टीतून हा नाविन्यपूर्ण उपक्रम विकसित करण्यात आला आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकांना अधिक जलद, सुलभ, पारदर्शक आणि विश्वासार्ह पोलीस सेवा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत ‘रत्नसेतू’ चॅटबॉट विकसित करण्यात आला असून, याद्वारे नागरिकांना विविध ऑनलाइन पोलीस सेवा त्यांच्या मोबाईलवर सहज उपलब्ध होत आहेत. यामुळे नागरिकांना पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची गरज कमी होऊन आवश्यक सेवा व माहिती काही क्षणांत मिळण्यास मदत होत आहे. या अत्याधुनिक प्रणालीमुळे नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचणार असून पोलीस सेवांमध्ये अधिक कार्यक्षमता, पारदर्शकता आणि लोकाभिमुखता निर्माण होत आहे.

उद्घाटनाप्रसंगी उपस्थित विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्र किशोर मीना यांनी या अभिनव उपक्रमाचे विशेष कौतुक केले. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिक आणि पोलीस यांच्यातील संवाद अधिक परिणामकारक करण्यासाठी अशा उपक्रमांची मोठी आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी ‘रत्नसेतू’ चॅटबॉटचा ९३७१४१५६१२ हा क्रमांक वापरून अधिकाधिक ऑनलाइन पोलीस सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4610035
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *