GRAMIN SEARCH BANNER

त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मलीन प्रकाशगिरी महाराजांचा पुण्यतिथी सोहळा संपन्न!

नाशिक – सालाबाद प्रमाणे याही वर्षी विश्वगौरवविभूषित परम सिद्ध स्वामी गगनगिरी महाराजांचे कृपापात्र शिष्य व पंचदशनाम जुना आखाडयाचे आजीवन थानापती असलेले ब्रह्मलीन प्रकाशगिरी महाराज यांचा ९ वा पुण्यतिथीउत्सव नुकताच श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील पंचदशनाम जुना आखाडा,निल पर्वत त्र्यंबकेश्वर येथे  विविध आखाड्यांच्या साधू संत मंडळींच्या उपस्थितीत व स्वामी गगनगिरी महाराजांच्या अनेक ठिकाणाहून आलेल्या भक्तमंडळींच्या साथीने अतिशय श्रद्धा प्रेम भक्तिभावाने संपन्न झाला. 

सदर पुण्यतिथी सोहळा हा प्रकाशगिरी महाराजांचे उत्तराधिकारी व पंच दशनाम जुना आखाड्याचे आजीवन थानापती असलेले व स्वामी गगनगिरी महाराजांचे किटाचे रान दाजीपूर आश्रमाचे मठाधिपती श्री कालिदास महाराज उर्फ आझादगिरी यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडला.

यावेळी भजन पूजन नामस्मरण व साधू भंडारा आदी विधी यथासांग संपन्न झाले. याप्रसंगी उपस्थित साधुसंत मंडळींना शाल व पाकीट देऊन सन्मानित करण्यात आले तसेच शालेय विद्यार्थ्यांना रायटिंग पॅड व वह्या यांचे वाटप करण्यात आले.

सदर प्रसंगी महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज,स्वामी शंकरानंद सरस्वती महाराज, ओमकारानंद महाराज,सेक्रेटरी अजय पुरी,विष्णु गिरी,छबी राम पुरी,जयगिरी,निमंत्रक दत्तगिरी महाराज, पुजारी व विविध आखाड्यातील साधु संत मंडळी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी व स्वामी गगनगिरी महाराज भक्त मंडळी यांनी परिसर फुलून गेला होता. यावेळी उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Total Visitor Counter

2474932
Share This Article