GRAMIN SEARCH BANNER

बिहारमध्ये हरवलेली महिला पाचल येथे सापडली; राजापूर पोलिसांनी रत्नागिरीतील सखी वन स्टॉपमध्ये केले दाखल

Gramin Varta
56 Views

तुषार पाचलकर / राजापूर : अरेरिया पोलीस ठाणे, बिहार  मधील हरवलेली महिला पिंकीदेवी राजेशकुमार देहाती (वय 46, रा. वार्ड क्रमांक 9, शिवपुरी, जि. अरेरिया, बिहार) ही आज पाचल बाजारपेठ परिसरात सापडली.

महिला मिळून आल्यावर तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असता, त्यांना रत्नागिरीत पोहोचण्यासाठी तीन ते चार दिवसांचा अवधी लागणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संबंधित महिलेस सखी वन स्टॉप रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले. यासाठी सरकारी जीप (क्र. MH08F490) द्वारे तिची व्यवस्था करण्यात आली.

राजापूर पोलीस ठाण्याचे सपोफौ कमलाकर पाटील, पोकॉ.रामदास पाटील व पोकॉ रामकृष्ण कात्रे यांच्या प्रयत्नातून सदर महिला लवकरच आपल्या मूळ गावी परतण्याची शक्यता आहे.

Total Visitor Counter

3366867
Share This Article