सावर्डेच्या दोन विद्यार्थ्यांची राज्य गुणवत्ता यादीत चमक

Gramin Varta
238 Views

सावर्डे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत सह्याद्री शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळा, सावर्डे येथील दोन विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. या यशामुळे सावर्डे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

शाळेचा विद्यार्थी श्लोक सूरज शिंदे याने शिष्यवृत्ती परीक्षेत २७० गुण मिळवत राज्य गुणवत्ता यादीत रत्नागिरी जिल्ह्यात चौथा, तर चिपळूण तालुक्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. तसेच मिन्सा अबुबकर तांबे या विद्यार्थिनीने २५२ गुण मिळवत ग्रामीण सर्वसाधारण विभागात प्रथम क्रमांक मिळविला असून रत्नागिरी जिल्ह्यात बारावे स्थान प्राप्त केले आहे. दोन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेची चमक दाखवत शाळेचे, पालकांचे तसेच सावर्डे परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल चिपळूणचे आमदार तथा सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शेखर निकम, कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, उपाध्यक्ष युगंधरा राजेशिर्के, प्रशांत निकम, डॉ. इसहाक खतीब, शांताराम खानविलकर, चंद्रकांत सुर्वे, मानसिंग महाडीक, मारुतीराव घाग, गुलाब सुर्वे, हरिश्चंद्र सुर्वे आणि महेश महाडीक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या विद्यार्थ्यांना शकील मोडक, रसिका सुर्वे, प्रणित राजेशिर्के आणि श्रुती कांबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळा, शिक्षक, पालक आणि सावर्डे परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Total Visitors :
4680884
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *