GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग: खेड जगबुडी पुलावर दुचाकी अपघातात तरुण जागीच ठार, एक गंभीर जखमी

खेड – मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील जगबुडी पुलाजवळ आज सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला, ज्यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवर दोन तरुण प्रवास करत होते. जगबुडी पुलाजवळ अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला आदळली. अपघाताची तीव्रता इतकी होती की, दुचाकीचे चाकही निखळून दूर फेकले गेले. या अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. दुसऱ्या तरुणाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, दुचाकीचा अतिवेग आणि त्यामुळे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

2455556
Share This Article