रत्नागिरी: मासेबाव येथे एलपीजी गॅस टँकर लीक; नागरिकात भीती, थोडक्यात मोठा अनर्थ टळला!

Gramin Varta
173 Views

रत्नागिरी : निवळी–गणपतीपुळे मार्गावरील मासेबाव येथे १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एलपीजी गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरमधून गॅस लीक झाल्याची धक्कादायक घटना घडली. भर रस्त्यावर गॅसची गळती सुरू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. गॅसचा टँकर लीक झाल्याची माहिती समोर येताच स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

एलपीजी हा अत्यंत ज्वलनशील असल्याने गळती झालेल्या टँकरमुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली होती. परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ घबराट पसरली होती. मात्र घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी तातडीने हालचाली सुरू केल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले आणि संभाव्य अनर्थ टळला.

घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांसह संबंधित यंत्रणांनी परिस्थितीची पाहणी करून आवश्यक खबरदारी घेतली. वेळीच यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्यामुळे गॅस गळतीच्या घटनेला वेळीच आळा घालता आला.

निवळी–गणपतीपुळे मार्गावर ही घटना घडल्याने काही काळ या परिसरात चिंतेचे वातावरण होते. टँकरमधून नेमकी कोणत्या कारणाने गॅस गळती झाली, याबाबत अधिक तपास केला जात आहे. वेळीच यंत्रणा सक्रिय झाल्याने मोठी दुर्घटना टळल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Total Visitors :
4710694
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *