रत्नागिरी : शहरातील एका बंगल्याच्या टेरेसची साफसफाई करत असताना पाय शेवाळ्यावरून घसरून खाली पडल्याने ५८ वर्षीय कामगाराचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (१५ ऑगस्ट) घडली. संतोष बाळकृष्ण देसाई (वय ५८, रा. ओरी, ता. जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष देसाई हे रत्नागिरी शहरातील एका बंगल्याच्या टेरेसची साफसफाई करीत होते. यावेळी टेरेसवर असलेल्या शेवाळ्यावरून त्यांचा पाय घसरला आणि ते टेरेसवरून खाली जमिनीवर पडले. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
घटनेनंतर त्यांना उपचारासाठी तातडीने सिव्हील हॉस्पिटल, रत्नागिरी येथे नेण्यात आले. मात्र, १५ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १.४५ वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
रत्नागिरी: टेरेसची साफसफाई करताना पाय घसरून खाली पडल्याने ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
Leave a Comment





