GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीचा हर्ष नागवेकर मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट वक्ता २०२५ चा मानकरी

Gramin Varta
41 Views

रत्नागिरी :  मुंबई विद्यापीठाचा 57 व्या युथ फेस्टिवल चा वार्षिक बक्षीस समारंभ दि. 4 ऑगस्ट 2025 रोजी ओरिएंटेशन हॉल चर्चगेट येथे पार पडला. या कार्यक्रमात 57 व्या युथ फेस्टिवल साठीची विशेष बक्षिसे व राष्ट्रीय , राज्य, विभाग अशा विविध पातळीवर विद्यापीठाचे नेतृत्व करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.रत्नागिरीचे खाद्यपदार्थ

सदर समारंभात चिल्ड्रन्स वेल्फेअर सेंटर लॉ कॉलेजचा विद्यार्थी आणि रत्नागिरीचा सुपुत्र कुमार हर्ष सुरेंद्र नागवेकर याला विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष 2024- 25 चा भाऊसाहेब वर्तक सर्वोत्कृष्ट वक्ता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट वक्ता साठीचा फिरता चषक व कायमस्वरूपी सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
हर्ष हा 57 व्या युथ फेस्टिवल 2024-25 मध्ये वक्तृत्व विभागात गोल्ड मेडलिस्ट ठरला होता.


या बक्षीस वितरण समारंभात अभिनेते श्रेयस तळपदे व हे विशेष अतिथी म्हणून , तसेच विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफे. डॉ. रवींद्र कुलकर्णी देखील उपस्थित होते.सर्वच स्तरावरुन हर्ष चे कौतुक होत आहे

Total Visitor Counter

2650960
Share This Article