मुंबई: मागील दोन-तीन दिवसांपासून राज्यात पावसाने पुन्हा जोर धरला असून आजपासून त्याचा प्रभाव आणखी वाढणार आहे. मुंबईतही उद्यापासून पाऊस पुन्हा सक्रिय होणार असून हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे.
जुलै महिन्यातील काही दिवस वगळता पाऊस कमी झाला होता, तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातही जोर नव्हता. मात्र, आता मॉन्सून सक्रिय झाला असून मुंबईसह अनेक भागांत पावसाची नोंद होत आहे.
हवामान स्थिती
ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पश्चिम उत्तर प्रदेश, झारखंड आणि कर्नाटक परिसरात चक्राकार वारे वाहत असून बुधवारपर्यंत बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.
आज पावसाचा अंदाज
मुसळधार पाऊस: रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, बीड, हिंगोली, धाराशिव, बुलढाणा, अकोला, वर्धा, नागपूर
विजांसह पाऊस: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा
मुंबई-पुणे हवामान
मुंबईतही उद्यापासून पाऊस पुन्हा सक्रिय होणार असून पावसाचे प्रमाण वाढेल. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात सोमवारपासून पावसाची सुरुवात होईल. कुलाबा केंद्रात १ ते ९ ऑगस्टदरम्यान २३.४ मिमी आणि सांताक्रूझ केंद्रात ५३.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे, जे ऑगस्टमधील सरासरीपेक्षा खूपच कमी आहे.
वादळाचा धोका
तामिळनाडू किनाऱ्याजवळ वरच्या हवेतील चक्राकार वारे तयार होण्याची शक्यता असून त्यामुळे पश्चिमेकडील मोसमी वारे कमकुवत होऊन पूर्वेकडून वारे वाहू शकतात. याचा परिणाम महाराष्ट्रावर होऊन मराठवाडा आणि अंतर्गत भागात वादळाचा धोका वाढू शकतो.
हवामान विभागाचा इशारा
कोकण: रत्नागिरीला यलो अलर्ट; ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्गमध्ये हलका ते मध्यम पाऊस.
पश्चिम महाराष्ट्र: कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूरला यलो अलर्ट; पुण्यात ढगाळ हवामान व हलका ते मध्यम पाऊस.
उत्तर महाराष्ट्र: नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहिल्यानगरमध्ये हलका ते मध्यम पाऊस.
मराठवाडा: लातूर, धाराशिव, बीड, परभणी, हिंगोली, नांदेडला यलो अलर्ट.
विदर्भ: बुलढाणा, अकोला, वर्धा, नागपूरला यलो अलर्ट.
पुढील काही दिवस राज्यात पावसाचा प्रभाव कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
राज्यात पावसाचा जोर वाढणार; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
