पाचलमध्ये मटका जुगार खेळताना एकाला पकडले

Gramin Varta
268 Views

राजापूर / तुषार पाचलकर: पाचल परिसरात टपरीच्या आडोशाला गैरकायदा बिगरपरवाना मुंबई मटका जुगाराचा खेळ सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत एका संशयिताला ताब्यात घेतले. ही कारवाई २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास जवळेथर फाटा येथे करण्यात आली.

या कारवाईत शशांक रविंद्र नारकर (३५, रा. पाचल, पेठवाडी, ता. राजापूर) हा लोकांकडून पैसे घेऊन मुंबई मटका जुगाराचा खेळ खेळवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याच्याविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत जुगारासाठी वापरलेले साहित्य तसेच रोख रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बाणे आणि पोलिस कॉन्स्टेबल घाटगे यांनी केली.

Total Visitors :
4776688
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *