GRAMIN SEARCH BANNER

कडवईत स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा; रिक्षा संघटनेची भव्य रॅली आकर्षणाचा केंद्रबिंदू

मकरंद सुर्वे / संगमेश्वर

संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वातंत्र्यदिनाचा उत्सव मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. कडवई बाजारपेठेत पारंपरिक सार्वजनिक ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. सरपंच विशाखा कुवळेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी भाईशा घोसाळकर हायस्कूल, महाराष्ट्र उर्दू हायस्कूल यांचे विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, व्यापारी, रिक्षा व्यवसायिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर करून वातावरण भारावून टाकले. भर पावसातही ग्रामस्थांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने रिक्षा मालक-चालक संघटनेच्या वतीने तुरळ, कडवई ते चिखली अशी प्रभातफेरी काढण्यात आली. शंभरहून अधिक रिक्षांचा या रॅलीत सहभाग होता. ध्वनिक्षेपकावर देशभक्तीपर गीतांचा निनाद सुरू असल्याने संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणाने दुमदुमून गेला.

प्रभातफेरीनंतर रिक्षाव्यवसायिकांनी बाजारपेठेतील सार्वजनिक झेंडावंदन कार्यक्रमात सहभाग घेतला. अखंड पावसातही ग्रामस्थ व विविध संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता कडवईतील स्वातंत्र्यदिन सोहळा संस्मरणीय ठरला.

Total Visitor Counter

2475125
Share This Article