तुषार पाचलकर / राजापूर
राजापूर तालुक्यातील पाचल येथे पारंपरिक दहीहंडी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. पाचल पंचक्रोशी मित्र मंडळ पाचल यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यास आमदार किरण (भैया) सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली व अपूर्वाताई किरण सामंत यांच्या सहकार्याने विशेष आकर्षण ठरलेल्या शिवशक्ती महिला गोविंदा पथकाला आमंत्रित करण्यात आले होते.
पाचल हे तालुक्यातील सर्वात मोठे व्यापारी केंद्र असल्याने येथे एकूण अकरा दहीहंड्या फोडल्या जातात. त्यापैकी सर्वात मोठी दहीहंडी, पंचवीस हजार पाचशे पंचवीस रुपयांच्या रोख बक्षिसासह, हॉटेल वैभव समोरील मैदानात उभारण्यात आली होती. शिवशक्ती महिला गोविंदा पथकाने पाच थर लावत ही दहीहंडी फोडून प्रेक्षकांची दाद मिळवली.
या सोहळ्यास अपूर्वा किरण सामंत फाउंडेशनच्या अपूर्वाताई सामंत तसेच शिवसेनेचे प्रकाश कुळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा दहीहंडी उत्सव जल्लोषात पार पडला.
उत्सव यशस्वी करण्यासाठी पंचक्रोशी मित्र मंडळाचे संदीप बारस्कर, सुरेश ऐनारकर, सचिन पांचाळ, वैभव वायकूळ, सुनील गुरव, महेश रेडीज, हर्षद तेलंग, राजू तेलंग, जगदीश (सोनू) पाथरे, निलेश बांधनकर, चैतन्य पाथरे, मंगेश पांचाळ, गणेश तेलंग, मंदार नारकर, संदीप परटवलकर, संदीप गुरव, राहुल गोसावी, पुष्पक तेलंग, सिद्धेश गांगण, युवराज मोरे व रुपेश बांदरकर आदींनी विशेष मेहनत घेतली.
पाचल येथे दहीहंडी सोहळा उत्साहात; शिवशक्ती महिला गोविंदा पथकाने पाच थर लावून फोडली दहीहंडी
