GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण : कळंबस्ते येथे पोलिस व्हॅनचा अपघात; चार पोलीस जखमी

Gramin Varta
9 Views

मुंबईहून रत्नागिरीकडे पालकमंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेसाठी येत होते

चिपळूण: मुंबई–गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथे शनिवारी रात्री पोलीस व्हॅनचा अपघात झाला. यात एका सहाय्यक पोलीस निरीक्षकासह तीन पोलीस कॉन्स्टेबल जखमी झाले आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेसाठी मुंबईहून रत्नागिरीकडे येत असताना ही दुर्घटना घडली.

जखमींमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पालवे, पोलीस कॉन्स्टेबल प्रविण सखाराम मडके (४३, नाकपाडा एम.टी, मुंबई), तन्मय खानविलकर व तुषार डांगरे यांचा समावेश आहे. सर्वांना तातडीने शहरालगतच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पालकमंत्री उदय सामंत यांचा रत्नागिरी दौरा लक्षात घेऊन विशेष सुरक्षा पुरवण्यासाठी ही टीम मुंबईहून शनिवारी दुपारी निघाली होती. रात्री कळंबस्ते येथे आल्यानंतर खराब रस्त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे पोलीस व्हॅन सुमारे १५ ते २० फूट खोल दरीत कोसळली.

घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघाताची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल पांडुरंग जवरत करत आहेत.

Total Visitor Counter

2648339
Share This Article