GRAMIN SEARCH BANNER

परशुराम घाटात एकेरी मार्गामुळे वाहतूक कोंडीचा त्रास

Gramin Varta
42 Views

चिपळूण: गणेशाेत्सवासाठी कोकणात येणाऱ्या मुंबईकर रविवारपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबई – गाेवा महामार्गावर वाहनांची गर्दी वाढली आहे. त्यातच चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटात एकेरी वाहतूक सुरु असल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.घाटात ठिकठिकाणी उभ्या असणाऱ्या महामार्ग पोलिसांचीही दमछाक हाेत आहे.

परशुराम घाट दरवर्षीच कोकणात येणाऱ्या मुंबईकरांसाठी डोकेदुखी ठरला आहे. जुना घाटमार्ग असो अथवा नवीन सुरु असलेला असो कोकणवासीय कायमच उपेक्षित राहिले आहेत. मुंबईपासून बांद्यापर्यंत प्रवास करताना रायगड हद्दीतील निकामी झालेला रस्ता आणि परशुराम घाट दरवर्षीच त्रासदायक ठरत आहे.

बाप्पाच्या आगमनाला केवळ दोन दिवस शिल्लक असून, मुंबईकर कोकणात येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अवघड परशुराम घाट व त्यातच घाटातील एकेरी मार्ग यामुळे त्यांच्या प्रवासात अडथळा निर्माण होत आहे. चिपळूण व खेड तालुक्यातील हद्दीतील सीमेवर वाहतूक पोलिसांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, मुंबईकडून येणारा गाड्यांचा ओघ पाहता त्यांचीही दमछाक होत आहे. वाहनांची संख्या अजूनही वाढणार असून, पाेलिस यंत्रणेची दमछाक हाेणार आहे.

Total Visitor Counter

2651854
Share This Article