GRAMIN SEARCH BANNER

रायगड – जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईट वापरास बंदी

रायगड: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान लेझर लाईटमुळे नागरिक तसेच बंदोबस्तासाठी नियुक्त अधिकारी-कर्मचारी यांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार करता, जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे.

दि. ०२ सप्टेंबर २०२५ (५ दिवसांचे विसर्जन) आणि दि. ०६ सप्टेंबर २०२५ (११ दिवस-अनंत चतुर्दशी) रोजी होणाऱ्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान लेझर लाईटचा वापर करण्यास कडक बंदी घालण्यात आली आहे.

अनेकदा मिरवणुकीतील ध्वनीक्षेपकांचा दणदणाट, डॉल्बी साऊंड सिस्टम, स्नो स्प्रे, हिट स्प्रे आणि लेझर बीम लाईट्समुळे नागरिकांना बहिरेपणा, हृदयविकाराचे झटके तसेच डोळ्यांचे आजार उद्भवले असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि आरोग्याच्या दृष्टीकोनातून ही कारवाई करण्यात आली आहे.

सदर आदेशाचा भंग करून विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईट वापर करणाऱ्या व्यक्ती/संस्था/मंडळ/संचालक यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये दंडनीय कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिला आहे.

Total Visitor Counter

2474942
Share This Article