रत्नागिरीत गोवंश मांस विक्रीचा पर्दाफाश; एक लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

Gramin Varta
997 Views

रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील उद्यमनगर परिसरातील लांजेकर नगर येथे विनापरवाना गोवंश प्राण्यांच्या मांसाची वाहतूक आणि विक्री करणाऱ्या एकावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत लियाकत शौकत दावत (वय ४८, रा. लांजेकर नगर) या आरोपीला अटक करण्यात आली असून, पोलिसांनी १ लाख ६ हजार ४८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार गणेश राजेंद्र सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २६ जून रोजी सायंकाळी १६.५५ वाजताच्या सुमारास आरोपी हा स्वःताच्या फायद्यासाठी विनापरवाना गोवंश प्राण्यांचे मांस विक्रीसाठी बाळगून असताना मिळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून ७ किलो आणि ४४ किलो ५०० ग्रॅम वजनाचे गोवंश मांस, मांस वाहतुकीसाठी वापरलेली होंडा ॲक्टिव्हा दुचाकी (एमएच ०८ एझेड ६४८५) आणि एक टाटा व्होल्टास कंपनीचा डीपफ्रिजर असा एकूण १,०६,४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी काशिमिरा पोलिसांत भारतीय न्यायसंहिता आणि महाराष्ट्र पशु संरक्षण (सुधारणा) अधिनियम २०१५ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitors :
4820686
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *