मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले; गाड्या ६ ते ७ तास विलंबाने

Gramin Varta
193 Views

रत्नागिरी: कोकण पट्ट्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेचे संपूर्ण वेळापत्रक विस्कळीत झाले असून, प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या ६ ते ७ तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दिवा-सावंतवाडी आणि सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्स्प्रेस नियोजित वेळेपेक्षा सहा तास उशिराने सावंतवाडी स्थानकात दाखल झाली. मंगळवारी मुंबई-मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस तब्बल सात तास उशिराने सावंतवाडी येथे पोहोचली, तर एलटीटी-मडगाव एक्स्प्रेस सुमारे तीन तास आणि मुंबई-मडगाव मांडवी एक्स्प्रेस सव्वा तास उशिराने धावत होती. सातत्याने होत असलेल्या या विलंबामुळे जनशताब्दी, तुतारी, मांडवी आणि कोकणकन्या यांसारख्या प्रमुख गाड्यांचे पुनर्नियोजन करूनही त्या वेळेत धावण्यास अपयशी ठरत आहेत.

Total Visitors :
4577002
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *