चिपळूणच्या खेळाडूंची दिल्लीत झेप

Gramin Varta
176 Views

चिपळूण : येथील मास्टर्स क्रिकेट अकॅडेमीचे खेळाडू राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी दिल्लीकडे रवाना होत आहेत, या संघांचे नेतृत्व महाराष्ट्र इन्व्हिटेशन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पार्थ हरेकर याच्याकडे सोपविण्यात आले आहे. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या अकॅडेमीने सलग सहाव्या वर्षी दिल्ली येथे राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याचा मान कायम राखला आहे. अकॅडेमीचे संस्थापक व प्रशिक्षक आकाश पवार तसेच सर्व निवड झालेल्या खेळाडूंना क्रीडाप्रेमींनी शुभेच्छा दिल्या असून, खेळाडू चिपळूण व रत्नागिरी जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Total Visitors :
4610075
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *