रत्नागिरी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी, रत्नागिरी तालुका क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना तसेच रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा १० सप्टेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल, बॅडमिंटन हॉल, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे उत्साहात पार पडली.
या स्पर्धेत १४, १७ व १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या विविध वजनगटांमध्ये कुस्ती सामने घेण्यात आले. रत्नागिरी तालुक्यातील विविध शाळांमधून सुमारे १२० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे संपूर्ण स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेचे प्रमुख नवनाथ जाधव सर यांनी स्पर्धेचे अतिशय नियोजनबद्ध व सुंदर आयोजन केले.
स्पर्धेचे उद्घाटन रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह सदानंद जोशी, व कुस्ती मल्ल जेष्ठ पैलवान मारुती पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी सदानंद जोशी, रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष भाई विलणकर तसेच तालुका समन्वयक विनोद मयेकर यांनी उपस्थित सर्व सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास असोसिएशनचे उपाध्यक्ष आनंद तापेकर, जिल्हा संघटक फैय्याज खतीब, सदस्य मानसिंग कदम सर, सदस्या सौ. कमल नितोरे विविध शाळांतील क्रीडा शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेतील पंच म्हणून मारुती गलांडे सर, सैफुदुद्दीन पठाण सर, भावेश सावंत, अतुल गराटे, गणेश गराटे, प्रणय गराटे, एम. डी. पाटील सर व जाकीर सय्यद यांनी जबाबदारी पार पाडली.
विद्यार्थ्यांमध्ये कुस्ती या पारंपरिक क्रीडा प्रकाराबद्दल आवड निर्माण करण्यासोबतच त्यांच्यातील क्रीडागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद निश्चितच समाधानकारक असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
रत्नागिरी तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
Leave a Comment





