राजापूरच्या लेकीचा दैदिप्यमान विजय; फिजा मुकादमने फॉरेन्सिक सायन्समध्ये पटकावले ‘गोल्ड मेडल’

Gramin Varta
124 Views

राजापूर: राजापूर तालुक्यातील वडद हसोळ या छोट्याशा गावातील फिजा मुकादम हिने शैक्षणिक क्षेत्रात सुवर्ण कामगिरी करत संपूर्ण जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि घरच्या जबाबदाऱ्या पेलत तिने फॉरेन्सिक सायन्स (Forensic Science) विषयात ‘गोल्ड मेडल’ मिळवत इतिहास रचला आहे.

वडिलांचे छत्र हरपलेले असतानाही खचून न जाता, आईची साथ आणि मामांच्या मार्गदर्शनामुळे फिजाने नागपूर ते अमरावती असा खडतर शैक्षणिक प्रवास पूर्ण केला. हॉस्टेलच्या चार भिंतीत राहून, प्रत्येक संकटावर मात करत तिने मिळवलेले हे यश केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण ग्रामीण भागातील मुलींसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. गावातील एका साध्या पार्श्वभूमीतून आलेल्या फिजाने आपल्या जिद्दीच्या जोरावर आभाळाला गवसणी घातली असून, आता ती देशाच्या आणि मराठी जनतेच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. तिच्या या यशाबद्दल वडद हसोळ ग्रामस्थांसह संपूर्ण जिल्ह्यातून तिचे कौतुक केले जात आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *