जेएनपीए बंदरात वाऱ्याचा हाहाकार; कंटेनर कोसळून एका कामगाराचा मृत्यू

Gramin Varta
103 Views

रायगड: जेएनपीए बंदराच्या हद्दीत असलेल्या खासगी एनएसएफटी बंदरात मुसळधार पाऊस आणि वाऱ्याच्या तडाख्यामुळे आज पहाटे मोठी दुर्घटना घडली. जहाजावरून कंटेनर लोड करत असताना वाऱ्याच्या जोरदार झोताने तीन रिकामे कंटेनर एका ट्रेलरवर कोसळले. या भीषण अपघातात ट्रेलरवर हेल्पर म्हणून कार्यरत असलेला १९ वर्षीय अजितकुमार प्रसाद याचा जागीच मृत्यू झाला, तर ३० वर्षीय नईम नासीर हा कामगार गंभीर जखमी झाला आहे. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास जहाजावरून स्लज ऑइल भरण्याचे काम सुरू असताना ही घटना घडली. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे बंदरात खळबळ उडाली असून, जखमी नईम नासीर याला तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची अधिक माहिती घेतली जात असून, प्रशासनाकडून अपघाताच्या कारणांचा तपास केला जात आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *