लांजा नगरपंचायतने उभारलेल्या सुलभ शौचालयासमोर पाणी व चिखल साचल्याने नागरिकांची गैरसोय

Gramin Varta
187 Views

लांजा /अरबाज नेवरेकर : लांजा नगरपंचायतीने उभारलेल्या सुलभ शौचालयासमोर पावसाचे पाणी व चिखल साचल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या परिसरात पाण्याचा निचरा होत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या कामामुळे परिसरातील निचरा व्यवस्थेवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शौचालयाचा वापर करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना तसेच पादचाऱ्यांना पाण्यातून व चिखलातून मार्ग काढावा लागत आहे.

बाजारपेठ परिसरातील हा वर्दळीचा भाग असल्याने अनेक नागरिक या मार्गाचा वापर करतात. पावसाचे पाणी साचल्याने ये-जा करताना अडचणी निर्माण होत असून परिसरात स्वच्छतेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

संबंधित यंत्रणांनी या समस्येकडे लक्ष देऊन साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी तसेच चिखलावर योग्य उपाययोजना करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *