चिपळूण: चिपळूण शहरातील संभाजीनगर परिसरात एका वृद्ध महिलेच्या टपरीतून सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी ३ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली असून, अज्ञात चोरट्याने ८८,५०० रुपये किमतीचे मंगळसूत्र लंपास केले आहे.
चिपळूण पोलीस ठाण्यात याप्रकरणी अनुसया गणेश पाटील (वय ६५, रा. मनोहर आंग्रे चाळ, संभाजीनगर) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आपल्या टपरीमध्ये एका पाकिटात २२.७३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र ठेवले होते.
अज्ञात चोरट्याने त्यांच्या नकळत टपरीत ठेवलेले हे पाकीट चोरून नेले. ही बाब लक्षात आल्यानंतर पाटील यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी ६ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.
चिपळूणमध्ये वडापाव टपरीतून वृद्ध महिलेचे मंगळसूत्र चोरीला
