GRAMIN SEARCH BANNER

आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रशिक्षण व रोजगार विभागातर्फे मंथन १.० कार्यक्रमाचे आयोजन

Gramin Varta
28 Views

देवरुख- संगमेश्वर तालुक्यातील आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित राजेंद्र माने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्रशिक्षण व रोजगार (ट्रेनिंग अँड प्लेसमेंट) विभागाअंतर्गत विद्यार्थी असोसिएशन  स्थापन करण्यात आली आहे. अशा विभागांतर्गत विद्यार्थी असोसिएशन स्थापन करणारे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय ठरले असून हा विद्यार्थी आणि  ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग यामधील महत्वाचा दुवा ठरणार आहे.

यावेळी महाविद्यालयात विशेष आयोजित कार्यक्रमात या असोसिएशनचे उद्घाटन करण्यात आले तसेच मंथन १.० या उपक्रमांतर्गत करिअर फेस्ट, स्पीड नेटवर्किंग, पी पी टी प्रेसेन्टेशन यासारख्या स्पर्धा घेण्यात आल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत  यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडले. याप्रसंगी उपप्राचार्य व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागप्रमुख डॉ. अनिरुध्द जोशी, मेकॅनिकल व ऑटोमोबाईल विभागप्रमुख डॉ. प्रशांत क्षीरसागर तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर सायन्स विभागप्रमुख प्रा. पूनम क्षीरसागर व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागप्रमुख डॉ. अनिरुध्द जोशी यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले कि, या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विद्यार्थी असोसिएशनमुळे विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य विकास वाढविण्याची संधी प्राप्त होणार असून त्यांची रोजगार क्षमता वाढविणे आणि त्यातून इंडस्ट्रीसाठी उपयुक्त मनुष्यबळ तयार करणे हा प्रामुख्याने उद्देश आहे. या माध्यमातून विद्यार्थी  हे विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम राबविणार आहेत.

यानंतर प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी सभासद व उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले कि,  या असोसिएशनच्या माध्यमातून महाविद्यालयामध्ये रोजगार आणि व्यवसायसंबंधी वातावरण तयार होण्यास चालना मिळणार असून मुलाखतीची तयारी, व्यक्तिमत्व विकास यासाठी विद्यार्थ्यांना मदत मिळणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी यामध्ये सक्रीय सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. तसेच  ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या सामारोपप्रसंगी स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व रोख बक्षिसे वितरीत करण्यात आली. स्पर्धा परीक्षण प्रा. मासूमा पागारकर, प्रा. मंगेश प्रभावळकर, प्रा. ऋतिक मयेकर यांनी केले. सूत्र संचालन आदिती महाडिक आणि ओमकार मुलूख यांनी तर आभारप्रदर्शन अपेक्षा हेलोदे हिने केले. विद्यार्थी प्रमुख म्हणून कात्यायनी जोशी हिची निवड करण्यात आली आहे.

Total Visitor Counter

3200152
Share This Article